राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
तर दुसरीकडे जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात, एका मागावर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयेत म्हणता अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“गेले १४ ते १५ दिवस किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, मालदीवचा दौरा या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर कोणताही खुलासा करत नाहीत. राजकीय आरोप आहे असं त्यांचं म्हणणं होतं, व्यक्तीगत आरोप करत आहेत असं म्हणत होते. पण काल ज्या पद्दतीने खुलासा झाला आहे त्यातून मी सत्य बोलत होतो हे समोर आलं आहे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
जन्मदाखल्यात खाडाखोड करण्यात आली
“भाजपाकडून हिंदू-मुस्लिम मुद्दा काढला जात होता. वानखेडे हे समीर दाऊद वानखेडे आहेत. जन्मापासून आजपर्यंत ते मुस्लिमच आहेत. त्याचा जन्मदाखला मी प्रसिद्ध केला आहे. यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्या बहिणीच्या दाखल्यात के वानखेडे शब्द वापरला आहे. हे दाऊद वानखेडे ज्यांनी धर्मांतर केल्यानंतर नाव बदललं होतं त्याच्या आधारे जन्मदाखला काढण्यात आला.
नंतर त्याच्यात खाडाखोड करण्यात आली आणि त्यातून बोगसगिरी सुरु झाली आहे. मी अजून काही कागदपत्रं समोर आणणार आहे,” असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…