महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचे घोषणा ना. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना त्यांनी हि घोषणा केली.
महाराष्ट्रातल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना यापूर्वी कामगार कल्याण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. आत्ता देखील कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन लवकरच कामगारांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या बाबत विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंधांच्या या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक साह्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील १३ पैकी नऊ लाख १७ हजार बांधकाम कामगारांना अर्थसाह्य करण्यात आले. यामुळे कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता,आता दिवाळीसाठी ५ हजार रुपये मिळणार असल्याने या कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…