ताज्याघडामोडी

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडेच लाच मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रायगडमधील अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून एका पोलीस हवालदाराकडेच ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. लाच विभगातील अधिकाऱ्याकडेच लाच मागितल्यामुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दुपारच्या सुमारास लाचलुचपत कार्यालयात घुसून अरुण बेलोसकर नामक व्यक्तीने जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप अधिकारी दीपक मोरे यांच्यावर केला. त्यामुळे त्यासंबंधी ५० लाख रुपये देण्याची मागणी त्या व्यक्तीने अधिकाऱ्याकडे केली. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर फिर्यादी अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली.

‘तुझी नोकरी घालवेल. तुझी नोकरी वाचवायची असेल तर मला पैसे दे’ अशा शब्दांत बेलोसकर याने दीपक मोरे यांना धमकावले. आणि तेथून निघून गेला. याप्रकरणी लाच मागणाऱ्या अरूण बेलोसकरविरुद्ध अलिबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago