पंढरपुर तालुक्यातील शिरढोण येथे आज शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी गावातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण,विविध ठिकाणी ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच भूमिगत गटारे बांधणे आणि पिण्याच्या पाईपलाईन टाकणे आदी कामांचे भूमिपूजन शिरढोणच्या सरपंच मुक्ताबाई बापू लोखंडे व उपसरपंच जांबुवंत हरिभाऊ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या भूमिपूजन प्रसंगी बोलताना जांबुवंत कांबळे यांनी गावातील मंजूर असलेल्या विविध विकास कामांची माहिती देत हि कामे अतिशय दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले.केंद्र आणि राज्य शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजनाचा लाभ शिरढोण ग्रामपंचातीच्या माध्यमातून मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगत पुढील काही दिवसात गावात आणखी काही कामे नव्याने हाती घेतली जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे,माजी सरपंच बिभीषण बंडगर,अण्णासाहेब भुसनर,गणेश भुसनर,ग्राम पंचायत सदस्य सुसेन भुसनर,विजय लोखंडे,सुरेश शिरतोडे,गणपत व्हरगर यांच्यासह जयवंत व्हरगर,देविदास भुसनर,संभाजी भुसनर,दत्तात्रय भुसनर,नामदेव साळूंखे,सीताराम रानगर,अजित लोखण्डे,दिलीप अधटराव,पुरंदर कांबळे,सर्जेराव निळे,सोमनाथ जावीर,सूर्यकांत भुसनर,अनिल अधटराव,अनिल लोखंडे,सूर्यकांत भुसनर,पोपट भुसनर,गणेश साळुखे तसेच ग्रामसेविका ज्योती जाडकर,शंकर लोखंडे,सोमनाथ भुसनर,बंटी बनसोडे आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…