मुलाच्या प्रेमात अडथळा ठरणारे वडील आणि त्यांच्या विवाहित गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला त्याने केला. या हल्ल्यात दोघांचा जीव गेला. मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. यावेळी वडिलांच्या मैत्रिणीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मुलाने त्यांच्यावरही हल्ला केला. ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कर्नाटकातील म्हैसूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्वत:च्या मुलाने आपल्या वडिलांची आणि त्यांच्या विवाहित मैत्रिणीची निर्घृण हत्या केली. घटनेचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. केजी कोप्पल येथील रहिवासी 56 वर्षीय शिवप्रकाश आणि म्हैसूरच्या श्रीनगर भागातील रहिवासी 48 वर्षीय लता अशी मृतांची नावे आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात लतादीदींचा मुलगा नागार्जुन हाही गंभीर जखमी झाला आहे. नागार्जुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आरोपी सागर घटनेनंतर तेथून फरार आहे. पोलीस पथकाने मृत शिवप्रकाशचा मुलगा सागर याचा शोध सुरू केला आहे. आरोपी सागरवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…