पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्यावर उकळते तेल फेकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. भावनाचे विवाहबाह्य संबंध असल्यचाचा सतीषला संशय होता.
यावरून त्यांच्या नेहमीच वाद होत. गुरुवारी रात्री भावना झोपली. त्यानंतर सतीश शुक्रवारी भल्या पहाटे उठला. भावना झोपलेलीच होती. सतीशने घरातील कढईत तेल उकळविले. ती झोपत असतानाच तिच्या अंगावर हे उकळते तेल ओतले. यात तिचे हात,पाय, छाती भाजली. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. पोलिसांनी या प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…