Categories: Uncategorized

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हजारोच्या संख्येने मनसेच्या ऊस परिषदेला उपस्थित रहा

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ऊस परिषदेचे मनसेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून या परिषदेले शेतकरी बांधवांनी उपस्तीत राहावे असे आवाहन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांनी केले,
शुगर कंट्रोल ॲक्ट 1966 नुसार ऊस घातल्यानंतर 14 दिवसाच्या आत एक रकमी FRP शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही FRP चे तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने घातला आहे. याचा जाहीर निषेध करून हा निर्णय कसल्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार करण्यासाठी व कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवण्यात साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पानगाव ता.रेनापुर या ठिकाणी पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.साखर कारखानदारांच्या संघानी केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडे एक रकमी FRP परवडत नाही त्यामुळे FRP तुकडे करून ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची परवानगी मिळावी ही मागणी केली होती. निती आयोगाने या मागणीची दखल घेऊन रमेशचंद्रन समिती नेमली आणि अहवाल तयार करण्यास सांगितले रमेशचंद्रन समितीने अहवाल देण्यापूर्वी फक्त साखर कारखानदार आणि बरोबर तीन बैठका घेतल्या व कृषिमूल्य आयोगाचा अहवाल मागितला. कृषी मूल्य आयोगाने FRP चे तुकडे करण्याची शिफारस नीती आयोगाकडे केली. त्यानंतर निती आयोगाने राज्यशासनाला पत्र पाठवले या पत्रात निती आयोगाने कारखान्याला ऊस घातल्यानंतर 60 % रक्कम 14 दिवसाच्या आत दुसरा हप्ता 20 % रक्कम पुढील 14 दिवसात व तिसरा हप्ता 20 % रक्कम पुढील 2 महिने किंवा साखर विक्री झाल्याबरोबर असे सुचवले होते.व या संदर्भात राज्यसरकारचे मत मागवले होते. परंतु राज्य सरकारने ऊस उत्पादकांचे मत विचारात न घेता सर्व साखर कारखानदार ,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ,सहकारी साखर कारखाना संघ यांचे मत विचारात घेतले व त्यानुसार पहिल्या 60 % हप्ता 14 दिवसात दुसरा 20 % हप्ता हंगाम संपल्यावर व तिसरा 20 % हप्ता पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी अशी शिफारस नीती आयोगाकडे केली आहे. यावर निती आयोगानेही या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. अशा प्रकारे प्रत्येक छोट्या-छोट्या मुद्द्यावरून एकमेकांना भांडणे केंद्र व राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर कोयता चालवण्यासाठी मात्र एकत्र येताना दिसत आहे .

या निर्णयाविरोधात तसेच काटामारी ,रीकव्हरी चोरी, ऊस तोडण्यासाठी कारखान्याच्या मुकादमाकडून शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी रक्कम, अव्हरेज वाहतूक पकडण्याची पद्धत, गेट केन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांकडून नेहमी केल्या जाणाऱ्या लुटीच्या विरोधात जनजागृती निर्माण करून शेतकर्‍यांची एकजूट करून लूट करणाऱ्या यांच्या विरोधात लढा उभाकरण्यासाठी व FRP चे तुकडे करण्याचा निर्णय शासनाला रद्द करायला भाग पाडण्यासाठी या ऊस परिषदेचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. या ऊस परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे शेतकरी संघटनेचे अरुणदादा कुलकर्णी मनसे प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांबेकर मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago