आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य झालेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं.
अशी घडली घटना
काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली बिहारची राजधानी भोपाळमध्ये. इथं राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा मुलगादेखील आहे. एका इमारतीतील लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्या अक्षय यांना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांबाबत माहिती समजली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.
कुटुंबाला बसला धक्का
घटनेच्या दिवशी अक्षय यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. आपल्या मुलाला लटकलेलं पाहून त्याच्या आईने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि अक्षयला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पत्नीनंही केली आत्महत्या
पतीनं आत्महत्या केल्याचं लक्षात आल्यावर पत्नी सुधानेही स्वतःला पेटवून घेत आपली जीवनयात्रा संपवली. आपल्यासोबत 4 वर्षांच्या मुलालाही पेटवण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र घरच्यांनी मुलाला कसंबसं यातून वाचवलं. सुधा या घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
गुंतागुंतीचा लव्ह ट्रँगल
अक्षय आणि सुधा यांच्या प्रकऱणाची कहाणी गुंतागुंतीचं असल्याची माहिती अक्षयचा भाऊ निलेशनं माध्यमांना दिली. अक्षयचा मित्र सागरनं त्याच्या पाठीत खंजीर खुपसत त्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्याचं त्यानं सांगितलं आहे. सागर आणि सुधा यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. हळूहळू हे संबंध अधिक दाट होत गेले आणि सुधा आपल्या पतीला सोडून सागरसोबत राहायला गेली होती. या घटनेनं व्याकूळ असलेल्या अक्षयनं आत्महत्येचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…