अखिल भारतीय वाल्मिकी आदिवासी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपुर येथील सोमनाथ अभंगराव यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष विशाल सूर्यवंशी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तळी यांच्या हस्ते सोमनाथ अभंगराव यांच्याकडून नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष सोमनाथ अभंगराव म्हणाले कि,गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय वाल्मिकी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी करत असलेल्या समाजसेवेच्या कार्याची व तळागाळातील सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी करत आलेल्या संघर्षाची दखल घेत मला जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.य पदाच्या माध्यमातून व संघटेनचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल सूर्यवंशी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणखी अविश्रांत पणे आपले समाजकार्य करणार आहे. या निवडीनंतर सोमनाथ अभंगराव यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून यावेळी गणेश तारापूरकर, बाबासाहेब अभंगराव, सतिश अभंगराव, अरूण कांबळे,संजय माने,अमर परचंडे, तुकाराम संगीतराव आदी उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…