प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५ टेंडर निघाले

काम निकृष्ट होऊ नये,नागरिकांकडून व्यक्त होतेय अपेक्षा 

गतवर्षी पंढरपूर नगर पालिकेस प्राप्त झालेल्या यात्रा अनुदानातून प्रदक्षिणा रस्त्याचा काही भाग व चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे रस्ते सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च कॉक्रीटीकरण करण्याच्या निर्णय नगर पालिकेने घेतला होता.या बाबत एप्रिल महिन्यात टेंडरही कढण्यात आले.तर यात्रा अनुदानाचा विनियोग शहरातील निवासी मालमत्ता धारकांना काही प्रमाणात करमाफी देण्यासाठी करण्यात यावा अशी मागणीही पुढे येऊ लागली.सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या आषाढी यात्रा नियोजनाच्या बैठकीत भगीरथ भालके यांनीही हीच मागणी केली होती.मात्र प्रदक्षिणा रस्त्याचे कॉक्रीटीकरण झाले पाहिजे या भूमिकेवर नगर पालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन ठाम असल्याचे दिसून आले.मात्र आचणकपणे आता नगर पालिका प्रशासनाने आपलाच निर्णय बदलून प्रदक्षिणा रस्ता डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत असून यासाठी जवळपास सव्वादोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या एका कामाचे एकूण ५ टेंडर काढण्यात आले आहे.       

पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा रस्ता तसेच चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने  नाराजी व्यक्त होत आली आहे.आता या ठिकाणी खडीकरण आणि डांबरीकरण केले जाणार असले तरी गेल्या तीन वर्षात पंढरपूर नगर पालिकेने शहरात अशाच प्रकारे खडीकरण व डांबरीकरण केलेल्या अनेक रस्त्यांची पाच -सहा महिन्यातच वाट लागल्याचे दिसून येते.एकीकडे शहरात विविध विकास कामे हाती घेतली जात असताना सामान्य नागरिक समाधान व्यक्त करतात आणि जेव्हा सदर कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत अशी टीका होऊ लागते तेव्हा त्याची दखल घेण्याची तसदी दाखविली जात नाही.ना संबंधित ठेकेदारावर कुठली कारवाई केल्याचे दिसून येते.         

 पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे शहरात राजकीय घडामोडीना वेग येऊ लागला आहे.त्याच बरोबर शहरात विविध रस्त्याच्या कामाचाही धडाका नेमका याच कालावधीत सुरु होणार असून प्रदक्षिणा रस्त्याच्या पाच टेंडर बरोबरच जवळपास ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले  शहरातील विविध रस्त्यांचे टेंडर मागील महिन्यात काढले गेले आहे.त्यामुळे शहरातील अनेक रस्ते चकाचक होणार असले तरी कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात येणारे हे रस्ते निदान दोन तीन वर्षे टिकावेत अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago