महावितरणकडून घरगुती अथवा व्यवसायीक वापरासाठी नविन विद्युत कनेक्शन घेताना परवानाधारक विद्युत निरिक्षकाचा टेस्ट रिपोर्ट देणे बंधनकारक असून यानंतर संबधीत ग्राहकाला महावितरण कडून विद्युत जोडणी दिली जाते.या टेस्ट रिपोर्टमध्ये नमुद केलेला विद्युत भार लक्षात घेवूनच ग्राहकांना विद्युत जोडणी शुल्क आकारले जाते.मात्र टेस्ट रिपोर्ट देताना कमी विद्युत भार दाखविल्याने महावितरणला प्राप्त होणार्या सुरक्षा ठेव रक्कमेवर मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागत आहे. ग्राहकांनी नमूद केलेल्या जागेमध्ये प्रत्यक्षात वायरींग करणारा वायरमन वेगळाच आणि टेस्ट रिपोर्ट देणारा विद्युत अभियंता वेगळाच असा प्रकार सर्रास घडत आहे.ही बाब अतिशय धोकादायक असून अनेकवेळा शॉटसर्किंटने आग लागल्यानंतर केलेल्या पाहणीत चुकीच्या पध्दतीने वायरिंग केल्याने दुर्घटना घडल्याचे दिसून येते.अशावेळी संबधीत टेस्ट रिपोर्ट देणार्या विद्युत अभियंत्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात वायरिंग करताना अनेक नियमांची काटेकोर अंमलबजावणी बंधनकारक असून यामध्ये, कुठल्याही कामासाठी लागणारे सामान याची निवड व सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातील बारकावे लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्लॅनिंग करण्याचे यांचे मुख्य काम. विद्युत क्षेत्रात काम करणार्या सुपरवायझरने विद्युत सामग्रीमध्ये फक्त खडख ब्रँडचाच वापर करावा. ग्राहकाचे बजेट व त्याची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य त्या मटेरिअलचाच उपयोग करावा. संपूर्ण वीजसंच मांडणीचा एक एस. एल. डी (सिंगल लाइन डायग्राम) तयार करावा. त्यावर ग्राहकाच्या उपकरणाच्या लोडप्रमाणे त्याच्या केबलची व एम. सी. बी. ची क्षमता असावी. उदाहरणदाखल सांगायचे झाल्यास ए.सी.साठी कमीत कमी चार स्क्वेअर मि.मि. जाडीची केबल जोडणे आवश्यक आहे. अशा रीतीने संपूर्ण संच मांडणीमधील उपकरणे, सर्किटस व त्यावरील भार याचा आढावा घेऊन त्यानुसार वीजवाहक तारा/ केबल, मेन डीबीमधील एम.सी.बी व इ. एल.सी.बी. (अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर) योग्य क्षमतेचे बसवल्यानंतर संचमांडणीस सुरक्षा प्राप्त होते. संचमांडणीस योग्य आर्थिग करणेही आवश्यक आहे.
हे सर्व केल्यानंतर वीजप्रवाह घेण्यासाठी वीज कंपनीला टेस्ट रिपोर्ट (चाचणी अहवाल) द्यावा लागतो. त्यावेळी मेगरने इन्सुलेशन रेझिस्टेन्स व अर्थ टेस्टरने अर्थ रेझिस्टेन्स मोजून कंपनीला टेस्ट रिपोर्टच्या स्वरूपात द्यावा लागतो.विद्युत संचमांडणीवरील चांचण्यांचा अनुभव नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट बिनचूक न जाऊन संचमांडणीस धोका होऊ शकतो. त्यामुळे महाराष्टशासनाच्या Rules and conditions for issuing certificates of competency under Regulation 29 of CEEo Regulation2010 या अंतर्गत सुपरवायझरसाठी एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा नियम विद्युत संचमांडणीसाठी लावता येणार नाही, अन्यथा विद्युत सुरक्षा धोक्यात येऊ शकते.विद्युत अपघात झाल्यास विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 161 प्रमाणे विद्युत निरीक्षकास अपघाताची चौकशी करण्यासाठी सिव्हिल कोर्टाचे अधिकार देण्यात आले आहेत.विद्युत निरीक्षकाने संच मांडणीमधील दोषांचे विवरण ग्राहकास दिल्यानंतर त्यांची पूर्तता ठरावीक मुदतीत झाली नाही तर त्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार महावितरणला आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…