शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड इथं ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.
दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते सहा इसम अचानकपणे शस्त्रांसह बँकेत घुसले. बँकेतील अधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखत या दरोडेखोरांनी काही क्षणांतच सर्व ऐवज लुटला. बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर हे सिल्व्हर रंगाच्या सियाज कारमधून पळून गेले. भरदुपारी घडलेल्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरोडेखोर कोणत्या दिशेने गेले?
बँक दरोड्यातील आरोपी नगरच्या दिशेला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे व इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापल्या गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करावा आणि अशी गाडी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…