फॅबटेकच्या लखन शिनगारे या विद्यार्थ्यांची निओवा सोल्युशन या कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्पुटर सायन्स विभागातील लखन शिनगारे या विद्यार्थ्यांची निओवा सोल्युशन या कंपनी मध्ये  निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली…

निओवा सोल्युशन हि लेस वर्क, डिम,नेक्सटीव्हा  यासारख्या नामांकित कंपनीना त्यांच्या मागणीनुसार आयओटी  सेक्युरिटी, क्लाउड  सेक्युरिटी, ट्रॅव्हल आणि डेटा अनॅलिटीकल  सॉफ्टवेअर पुरवण्याचे काम करते. या कंपनीमध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत  ट्रेनिंग दिल्यामुळे  विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निवड प्रक्रिये मध्ये फायदा होत असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली..

फॅबटेक  अभियांत्रिकी  महाविद्यालय हे  विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी सतत  प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण  आणि त्यांची कारकीर्द आमच्यासाठी अधिक मूल्यवान आहे, असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर. मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
    निवड झालेल्या या  विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस  पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्पुटर सायन्सचे  विभाग प्रमुख प्रा. पराग दौन्डे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago