Categories: Uncategorized

वर्ध्यात मौलानाने अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर केला अनैर्सिक बलात्कार

वर्ध्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. एका मौलानाने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे. या मौलानाने अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर अनैर्सिक बलात्कार केला आहे. संबंधित घटना ही मंगळवारी (19 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं 25 वर्षीय आरोपी मौलानाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मौलाना विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित घटना उघड झाल्यानंतर वर्ध्यात एकच खळबळ उडाली. 

आरोपी मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्याला सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकटं बघितलं. यावेळी तो पीडित मुलाला गोड बोलून एका खोलीत घेऊन गेला. त्याने आजूबाजूला कुणी नाही ना याची शहानिशा केली. त्यानंतर त्याने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार मुलाने घरी जावून आपल्या आई-वडिलांना सांगितला.  हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांचा संतापाचा पारा चढला.पीडित मुलाच्या आईनेघडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रामनगर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांनी आरोपी मौलाना समीउल्ला याला बेड्या ठोकल्या.आरोपी मौलाना हा गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे. त्याचं शिक्षण सुरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरसातून पूर्ण झालं आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago