मेडिकल विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागच्या कारणांची सध्या चर्चा सुरु झाली असून पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीला प्रेमभंग झाल्यामुळे तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे तिने टोकाचा निर्णय़ घेतला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
गळफास घेऊन आत्महत्या
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील तीर्थंकर महावीर विद्यापीठात MDS करणाऱ्या डॉ. वैशाली चौधरी हिनं तिच्या हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत जवळपास 200 वेळा ‘आशिष लव्ह वैशाली’ असं लिहिलं होतं. त्यावरून पोलिसांनी आशिषचा शोध घेतला असता त्यांना वैशालीच्या प्रेमप्रकरणाचा शोध लागला.
डॉ. आशिष जाखड आणि वैशाली हे एमबीबीएसचं एकत्र शिक्षण घेत होते. या काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी एकमेकांशी लग्न कऱण्याचाही निर्णय घेतला मात्र MBBS पूर्ण झाल्यानंतर डॉ. आशिष दिल्लीला निघून गेला आणि डॉ. वैशाली MDS करू लागली.
प्रेमभंगाचं दुःख
दिल्लीला गेल्यानंतर आशिष आपलं वचन विसरला, अशी वैशालीची तक्रार होती. या मुद्द्यावरून ती अनेकदा आशिषला भेटायचा प्रयत्न करत होती, मात्र आशिष ते टाळत असल्याचं सांगितलं जातं. या प्रेमभंगाच्या दुःखातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री वैशाली हॉस्टेलमध्ये आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आल्यानंतरगळफास लावून आयुष्य संपवलं.
दुसऱ्या डॉक्टरवरही संशय
FIR मध्ये डॉ. समर्थ जोहरी या आणखी एका डॉक्टरचंही नाव आलं आहे. डॉ. समर्थ हा वैशाली आणि आशिष यांचा मित्र असल्याचं समजतं आहे. आशिष आणि समर्थ यांनीच असं काहीतरी केलं, ज्यामुळे आपली मुलगी बेचैन होती, असा दावा वैशालीच्या वडिलांनी केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…