ताज्याघडामोडी

रिक्षाचालक तरुणाचा झोपेतच गळा चिरून खून; बाजूला झोपलेल्या भावाला पत्ताच नाही!

हडपसर हद्दीत पंधरा नंबर चौक येथील राहत्या घरात सख्ख्या भावाचा झोपेत असताना चाकूने गळा चिरून खून केल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, ही धक्कादायक घटना पहाटे उघडकीस आली आहे.

प्रदीप शिवाजी गवळी ( वय २३ रा.पंधरा नंबर,हडपसर मूळ रा.तुळजापूर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीपला पंचनामा करून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रदीप व त्याचा २९ वर्षाचा भाऊ हे दोघेच भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहत. प्रदीप रिक्षा चालवत होता तर त्याचा भाऊ हा ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्याचे काम करत होता. सोमवारी रात्री दोघे जेवण करून झोपी गेले होते. मात्र पहाटे प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे भावाने सांगितले आहे. घटनास्थळी चाकू पोलिसांना मिळून आला आहे. मृतदेह घरातच मिळून आल्याने पोलिसांचा भावावरच संशय येत असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ठाण्याला राहत असणाऱ्या वडिलांना पोलिसांनी बोलावून घेतले आहे. याबाबत पुढील तपास करण्यात येत असून लवकरच खुनाची उकल होईल, असा विश्वास सहायक आयुक्त विधाते यांनी व्यक्त केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

3 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago