राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत असलेल्या महिला कंडक्टर बीड -पंढरपूर एसटी बस घेऊन पंढरपूरकडे येत असताना आष्टी तालुका मोहोळ येथे एसटी मध्ये चढत एका महिला प्रवाशाने रोपळेचे तिकीट मागितल्या नंतर वाहक शामल नवनाथ पांचाळ यांनी या एसटी बसला रोपळे थांबा नाही तुम्ही पंढरपूरचे तिकीट घ्या रोपळे येथे सोडले जाईल असे सांगितले.
मात्र महिला प्रवाशाने फिर्यादी वाहक महिलेस रोपळेचेच तिकीट पाहीजे आहे , तुम्ही का सोडु शकत नाही असे म्हणुन व एसटी चालक तसेच एसटी मध्ये बसलेल्या लोकांसमोर अरेरावीची भाषा वापरुन शीट वरुन उतरुन फिर्यादीच्या अंगावर धावून जात तुला मारते असा ओरडाओरडा करुन बघुन घेते अशी धमकी दिली. म्हणुन फिर्यादी वाहकाने तीला समजावुन सांगुन सुध्दा ती ऐकणेच्या मनस्थितीत नव्हती तु पंढरपुर एसटी स्टँन्डवर चल तुला एस टी महामंडळामध्ये नोकरी करु देणार नाही अशी धमकी दिली.
एसटी बस पंढरपुर बसस्थानकावर लावली असता तेथील एक अनोळखी स्त्री येवुन दोघीने मिळुन सदर महिला वाहकास गणवेशाला धरुन खाली ओढाओढी करु लागले.व धक्काबुक्की केली .त्यावेळेस एस टी चालक सर्जेराव गोपीनाथ चव्हाण, भागवत तुकाराम शेलकर रा.सावतामाळी चौक आंबेजोगाई जि बीड ,सज्जला प्रभाकर राऊत दोघे रा.वरपगाव ता. आंबेजोगाई जि बीड यानी पंढरपुर बसस्थानकावर सोडवासोडव केली.
त्यानंतर पंढरपुर बसस्थानकावरील कुठल्याही अधिका-याना व कर्मचा-याना माहीती न देतासदर एसटी क्रं MH20BL2925 ही गाडी डायरेक्ट पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गेटमध्ये आणुन लावण्यात आली होती असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.