अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, पहाटेच दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे,अवैध दारू विक्री करणार्यांना नियमाचे उल्लंघन करीत दारु विक्रीस प्रतिबंध करणे तसेच इतरही नियमांना ढाब्यावर बसवून अनेक वाईन शॉप व परमिटरुम मधून दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे गरजेचे असताना उत्पादन शुल्क विभाग या गैरप्रकाराकडे कडे कानाडोळा करीत असून महाराष्ट्र सरकारच्या दारुबंदी कायद्याला हरताळ फासण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील अनेक वाईन शॉप व परमिटरुम चालक करीतअसल्याची चर्चा आहे. ज्यांच्याकडे दारु पिण्याचा परवाना आहे त्यांनाच देशी विदेशी दारु विक्रीची दुकाने व परमिटरुम आदींमधून दारु विक्री करण्यात यावी असा नियम असताना बहुतांश वाईन शॉप व परमिटरुम मधून दारु पिण्याच्या परवान्याची कुठलीही पडताळणी न करताच थेट विक्री केली जात असल्याचे संबंधित परमिट रूम अथवा वाईन शॉपच्या सीसीटीव्हीची पडताळणी केल्यास दिसून येईल..सर्वच दारु विक्री दुकाने आणि परमिट रुममध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्या असून यामधील फुटेजची तपासणी केल्यास ढाबे चालकांना अथवा त्याने पाठविलेल्या व्यक्तीस एकाच वेळी बॉक्सच्या माध्यमातून शेकडोंनी देशी विदेशी दारूची बाटल्या विक्री केल्या जात असल्याचे दिसून येते.
देशी दारू दुकान व बियरबार चालकांनी वेळेच्या आत दुकाने उघडू नये. तसेच दिलेल्या वेळेच्या नंतर दुकान उघडे ठेवू नये. शासकीय बंदच्या दिवशी दिवसभर दुकाने उघडे नये. एका व्यक्तीस पिण्याकरिता दारूचा किती पुरवठा करावा याबाबत दिलेल्या नियमाचे पालन तंतोतंत करावे. दुकानातून इतरांना विक्रीकरिता किंवा अवैधरित्या व्यवसायकरिता दारू विक्री करू नये अशा सक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत निदान निवडणूक आचार संहीतेेच्या काळात तरी त्याचे तंतोतंत पालन होणे गरजेचे असताना उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे वेळेचे बंधन,दारु विक्रीचे नियम आणि दारुबंदी कायदा कलम 65 नुसार अवैधरित्या दारुची वाहतूक होत असल्याचे दिसून येते.सातारा येथे विनापरवाना दारु विक्री करणार्या वाईन शॉप वर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून त्याच बरोबर निर्धारीत वेळेपुर्वी दारु विक्रीची दुकाने उघडल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती.मात्र पंढरपूरातील अनेक परवानाप्राप्त देशी दारुची दुकाने अगदी पहाटे पाच पासून उघडी असतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
पंढरपूर तालुक्यातील अनेक ढाब्यांवर विनापरवाना दारु विक्री केली जात असून ही दारु विक्रीसाठी कुठून उपलब्ध होते याचा शोध घेण्यास उत्पादन शुल्क विभाग का अपयशी ठरत आहे हे एक गौडबंगालच आहे.शहर व तालुक्यातील काही ढाब्यांवर रात्रीच्या वेळी फेरफटका मारल्यास या ठिकाणी रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येेतो.गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे अनेक निर्बंध लढण्यात आलेले असताना पंढरपूर उपविभागीय पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध दारू विक्री विरोधात दारू बंदी अधिनियम ६५ ई नुसार शेकडोंनी कारवाया केल्या आहेत.मात्र याच काळात पंढरपूर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाया अगदी नगण्य असल्याचे दिसून येते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…