शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे.
बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवाल केला आहे.
शिवसेनेचे 12 आमदार पक्षात नाराज आहेत. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे. सरकारच्या पापाच्या घडा भरलाय. लवकरच तो फुटणार आहे, असा इशाराही त्यांना दिला.
“हे सरकार 100 पैकी 100 टक्के नापास आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करतात. पण सेनेचे 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षात फार मोठी खदखद आहे. नाराज सेना आमदारांना न्याय मिळत नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकासासाठी निधी मिळत नाही आणि विकास होत नाही”, असं लोणीकर म्हणाले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…