युटोपियन शुगर्स ऊस उत्पादक व कामगार यांची दिवाळी करणार गोड

जागतिक पातळी वरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे व पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या साखर कारखान्यांना चांगला दिलासा मिळेल व पुढील तीन ते चार वर्षात साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर निघेल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल असा आशावाद सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

 

कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दि.१७/१०/२०२१ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक आ.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, रोहन परिचारक,ऋषिकेश परिचारक,यांचेसह पांडुरंग स.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत नाना देशमुख,पंढरपूर कृ.उ.बाजार समितीचे सभापती दिलीप अप्पा घाडगे, शिवानंद पाटील,दाजी पाटील, दिलीप चव्हाण,सतीश मुळे,लक्ष्मण धनवडे,बाळासाहेब देशमुख,रतीलाल गावडे,राजुबापू गावडे, आगतराव रणदिवे,खंडेराव रणदिवे,अरुण घोलप, इन्नुसभाई शेख,शिवाजीराव नागणे,औदुंबर वाडदेकर,गौरीशंकर बुरकुल,सिद्धू सावकार,जालिंदर हुन्नुर्गी,राजू पाटील,नितिन पाटील,नामदेव जानकर,बाळ दादा काळुंगे,संभाजी माने,पांडुरंग हाके,धनाजी कोळेकर,कल्याण नलवडे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे,सी.एन.देशपांडे तसेच मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक ठेकेदार आणि कारखान्याचे  सर्व खातेप्रमुख,अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

     यावेळी बोलताना आ.परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा आठवा गळीत हंगाम असून  मागील सात ही हंगामात युटोपियन ने विक्रमी उत्पादन केले आहे. सध्या राज्यातील व परिसरातील कारखानदारी अडचणीत आहे. परिसरातील कारखान्याचे ऊस उत्पादक चिंतेत आहेत.मात्र,सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेऊन राजकारण विरहीत कारखाना चालविणे आज काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांचा ही ऊस गळीतास आणण्याच्या दृष्टीने युटोपियन शुगर्स प्रयत्न करणार आहे.देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी हे साखर उद्योगासाठी सकारात्मक असून,त्यांच्या प्रयत्नाने इथेनॉल निर्मितीस चालना मिळत आहे.त्यामुळे देशांतर्गत असणार्‍या जास्तीच्या साखरेचे उत्पादन कमी होऊन,उपलब्ध साखरेस चांगला दर मिळेल त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांनी एकूण गाळपाच्या ३०% पर्यन्त इथेनॉलबनवणे गरजेचे आहे असे मत आ.परिचारक यांनी व्यक्त केले.

      स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,मोठ्या मालकांच्या आदर्शावरती आम्ही वाटचाल करीत असून,सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे.मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य तो दाम देण्याची भूमिका आम्ही घेत असून, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गळीत झालेल्या ऊसासाठी एकूण दर २२०० रु,प्रमाणे आम्ही देणार आहोत व कर्मच्यार्‍यांना ही दिवाळी बोनस देणार असल्याची घोषणा उमेश परिचारक यांनी केली.

      पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊसाची नोंद आहे. मागील सर्व विक्रम मोडीत काढीत नवे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सध्या सततच्या पाऊसामुळे चालू वर्षी ऊस तोडणी मध्ये विलंब होण्याची शक्यता असून चालू गळीत हंगाम हा लांबण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर असणार्‍या अडचणी मध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ही चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ६.५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल व कारखान्याच्या आसवांनी प्रकल्पातून १ कोटी ५० लाख लिटर इथेनॉल चे उत्पादन करण्यात येणार आहे.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

 सदर प्रसंगी मा.जि.प. सदस्य शिवानंद पाटील, पांडुरंग स.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी समयोचित भाषणे करून गाळप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर कृ.उ.बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांनी २२०० रु.दर जाहीर केल्याबद्दल चेअरमन उमेश परिचारक यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago