सहकार शिरोमणी कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

निसर्गाचे चक्र सतत बदलत असते, कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त्‍ पडतो त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर होतो, देशात सर्वात जास्त साखरेचे उत्पादन आपल्या राज्यात होते, साखरेचे उत्पादन वाढले की, साखरेचा दर कमी होतो आणि उत्पादन कमी झाले की दर वाढतो, त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा असे प्रतिपादन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यानी केले. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगाम शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते.  

            राज्यातीत अनेक कारखान्यांना आधुनिकीकरण, दुष्काळ, साखरेतील चढ उतार, कोरोना या मुळे फटका बसला आहे. कारखाना बंद राहिला तर त्यावर अवलंबुन असणाऱ्या लाखो शेतकरी, मंजुर, कामगार व त्यांचे कुंटुंब उध्वस्त्‍ होते, साखर कारखानादारी जगली पाहिजे, बंद असलेल्या कारखान्यास जीवदान मिळाले पाहिजे, आजारी कारखान्यास सहकार्य केले पाहिजे तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत, आपले शासन हे शेतकऱ्यांच्या हितांचे विचार करणारे शासन असून, सांगोल्याचा बंद कारखाना आज सुरु केला आणि कोरोना काळात सुध्दा कल्याणराव काळे यांच्या जिद्द व चिकाटीमुळे या कारखान्यास शासन थकहमी मिळाली असल्याचे सांगितले. ज्या कारखान्याचे 10 लाखपेक्षा जास्त्‍ गळीत होते त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती झाली पाहिजे, इथेनॉल निर्मिती वाढुन साखरेचे उत्पादन कमी झाल्यास साखरेचे दर वाढणार आहेत, त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार असल्याचे सांगुन गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या.

            सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 22 वा गळीत हंगाम शुभारंभ आज ह.भ.प. जयवंतराव बोधले महाराज, पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते तसेच धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगेसर, निशिगंधा सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार, आणि वसंतदादा मेडिकल फौऊडेशनचे संस्थापक डॉ.सुधीर शिनगारे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न्‍ झाला. यावेळी मान्यवरांचे शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली. तत्पुर्वी गव्हाण व काटा पुजन कारखान्याचे संचालक राजाराम खासेराव पाटील व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.वर्षाताई पाटील या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस मा.पाहुण्यांच्या शुभहस्ते श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले  कोणताही राजकीय वारसा नसताना स्व. दादांनी या माळरानावर या कारखान्याची उभारणी केली, त्यांच्या आशिर्वादाने आम्ही सर्व संचालक आपल्या सर्वांचे सहकार्याने कारखान्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रयत्न्‍ करीत असून, संघर्षातुन मार्ग काढत आहोत. मागील दोन वर्षात साखरेचा कोटा, उचल धोरण, साखरेचे दर कमी, द्यावयाची एफ.आर.पी. त्यामुळे प्रती पोत्यास वाढणारा व्याजाचा बोजा यामुळे राज्यातील सर्वच कारखाने आर्थिक अडचणीत होते. मात्र यागळीत हंगामासाठी सर्व अडचणीवर मात करत आम्ही सर्व संचालकांनी स्वताची प्रॉपर्टी गहाण ठेवुन, सुमारे 22 ते 23 कोटी गुंतवणुक केली असून, चालु गळीत हंगामात सुमारे 5.50 लाख मे.टनापेक्षा जास्त ऊस गळीत करण्याचे उद्दिष्ट् ठेवुन, मशिनरी देखभाल दुरुस्तीची सर्व कामे करुन घेण्यात आली आहेत. 240 ट्रक ट्रॅक्टर, 227 बैलगाडी, 110 ट्रॅक्टर बैलगाडी करार करुन यंत्रणा सज्ज्‍ ठेवण्यात आली आहे. त्यामुळे डिस्टीलरी पुर्ण क्षमतेने चालविण्यात येणार असून, सहवीज निर्मिती प्रकल्पातुन जास्तीत-जास्त्‍ वीज एक्सपोर्ट करण्यात येणार आहे. त्याचा फायदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. तसेच चालु गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव बोधले महाराज यांनी मनोगत व्यक्त करुन गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या, यावेळी उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले, आभार व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी मानले तर सुत्र संचलन समाधार काळेसर यांनी केले.

            सदर प्रसंगी मा.उपप्रादेशिक सहसंचालक (साखर) श्री.पांडुरंग साठेसाहेब, लेखा परिक्षक वर्ग-1 कुबेर शिंदेसाहेब, कार्यालयीन अधिक्षक निबंर्गीसाहेब, श्री.व्होटेसाहेब, तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पंढरपूर श्री.तांदळेसाहेब,  पत्रकार इतर विविध संस्थांचे पदाधिकारी  तसेच श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे मिस्टर संचालक महादेवभाऊ देठे, समाधान काळे, आजी-माजी संचालक, सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक सर्व श्री मोहन नागटिळक, गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभीषन पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, मिस्टर संचालक अरुण बागल,  कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, फायनान्स्‍ मॅनेजर रविंद्र घुले, चिफ अकौंटंट  बबन सोनवले, टेक्निकल जनरल मॅनेजर  प्रकाश तुपे, प्रॉडक्शन मॅनेजर नारायण कुंभार, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळुमकर, डिस्टीलरी मॅनेजर पोपटराव घोगरे, को-जन मॅनेजर संभाजी डुबल, अधिकारी कर्मचार व ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago