Categories: Uncategorized

जनशक्ती संघटनेने पुकारलेल्या ऊस वाहतूकदारांच्या संपास संजय कोकाटे यांचा पाठींबा

सध्या सर्वच साखर कारखान्यांची गाळप सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे ऊस वाहतूकदार शेतकर्यांनी आपापले वाहन सज्ज करून ऊसतोडणी कामगार घेऊन येण्याची लगबग सुरू आहे बरेच वाहतूकदार लेबर घेऊनसुद्धा आलेले आहेत तरीसुद्धा ऊस वाहतूक दरवाढ किती देणार? हे कुठल्याही साखर कारखान्यांनी जाहीर केलेले नाही किंवा उसाचा पहिला हप्ता किती देणार ? एकरकमी देणार का ? टप्प्या टप्प्याने देणार तर किती दिवसांत देणार ? पहिला हप्ता किती देणार हे जाहीर केलेले नाही उलट ऊस वाहतूकदार मालका समोर पर्याय नाही त्यांना काहीही दिले नाही तरी ते वाहतूक करणारच अशा भ्रमात कारखानदार असल्यामुळे ते वाढ जाहीर करत नाहीत त्यामुळे आंदोलनकर्त्या संघटनांना संप पुकारण्याशिवाय कुठलाही पर्यायच राहिला नाही आणि त्यांनी तो पुकारला.

जनशक्ती शेतकरी संघटनेने त्यांचे काम केले आहे आता आपली जबाबदारी आहे की संप यशस्वी करून आपल्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घ्यायच्या त्यासाठी सर्व वाहनधारक शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांचा सक्रिय सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.तुम्ही जर वाहतूक बंद ठेवली तर तुमचा कुठलाही तोटा होणार नाही कारण आज ऊस वाहतूक करून परवडतच नाही उलट कारखान्यांकडून आपण दरवाढ घेऊनच वाहतूक सुरू केली तर एका वाहन मालकास किमान दीड ते दोन लाख रुपयांचा फायदा होणार आहे मग तुम्ही ठरवा की आपला फायदा करायचा का तोटा ?शेतकरी संघटना या आपल्या न्याय्य हक्कासाठी लढत असताना त्याचा काय फायदा आहे आपण काय त्यांना पैसे देणार आहे काय ? कुठलाही फायदा नसताना ते आपल्यासाठी रस्त्यावर येत आहेत स्वतःवर केसेस करून घेत आहेत ही लढाई संघटनांच्या प्रतिष्ठेची नसून आपला फायदा का तोटा होणार ही ठरविणारी आहे त्यामुळे आपले कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणे आणि हे आपण सर्वांनी करावे अशी सर्व शेतकरी व वाहनमालकांना विनंती करतो.

ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव द्यायचा म्हटले किंवा वाहतुकीस दरवाढ द्यायची म्हटलं की कारखानदारी परवडत नाही असे म्हणतात व हातात अर्धा डझन कारखाने असूनसुध्दा आजूबाजूचे कारखाने आम्हालाच मिळावेत म्हणून देव पाण्यात घालून बसतात हे आपण बघतच आहात हे कशाचे लक्षण आहे मित्रांनो याचा विचार करा वाहतुकीस दरवाढ द्यायची म्हणजे ऊस शेतकऱ्यास कमी दर असे समीकरण सांगितले जाते मग मित्रांनो गेल्या चार पाच वर्षांत वाहन मालकास दरवाढ दिली नाही याचा शेतकर्यास किती फायदा झाला आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

साखर कारखाने किती इमानदारीने व काटकसरीने चालतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे वजनकाटा बाबतीत रिकव्हरीच्या बाबतीत काय काय गोष्टी घडतात हेही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे त्यामुळे झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या कारखानदारास जागे करण्यासाठी संप यशस्वी होणे गरजेचे आहे.आपल्याला संप हा शांततेच्या मार्गाने करावयाचा आहे आपण तर सहभागी व्हायचे आहेच पण आपल्या परिसरातील गावांतील मित्रपरिवारातील सर्व शेतकरी व ऊस वाहतूकदार मालकांना विनंती करून आपला फायदा कसा व कशात आहे हे समजून सांगायचे आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही घटना आपल्या हातून घडू नये याची काळजी घ्यायची आहे.

आंदोलन करणाऱ्या संघटनेचा किंवा माझा यामध्ये कुठलाही फायदा नसताना तुमचा न्याय्य हक्कासाठी आम्ही सर्व जण लढत असताना आपण हिरहिरीने यामध्ये भाग घेऊन लढा यशस्वी करायचा आहे व आपण सर्वजण तो लढा यशस्वी करणारच आहे येणार्या काळात अनेक संघटना, पक्ष, व्यक्ती आपल्याला पाठिंबा देणार आहेत आपणही सर्वजण हिरहिरीने भाग घेणार आहात याची खात्री आहे व शेवटी हे आंदोलन यशस्वी होऊन आपल्याला आपल्या कष्टाचा, घामाचा योग्य मोबदला मिळो अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो
जय हिंद, जय महाराष्ट्र , जय शेतकरी एकजूट !

कळावे आपला

संजय (बाबा) कोकाटे
शिवसेना माढा विधानसभा मतदारसंघ

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

8 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

9 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago