गुन्हे विश्व

बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्…; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

आरोपींनी मसाज पार्लरमध्ये येत एक लाख रुपये द्या, अन्यथा पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने बदनामीपासून वाचण्यासाठी गॅलरीत लपायला गेलेल्या एका महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही खंडणीखोरांना अटक केली आहे. रवी गोविंद कांबळे, सुहास भगवान पोवार आणि नवाज जबीर शेख असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत.

यापैकी रवी कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. तर शोभा वसंत कांबळे असं मृत महिलेचं नाव असून त्या जवाहरनगर येथील रेणुका मंदिर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवणाप्पा पाटणे हायस्कूल रोडवरील राजारामपुरी 11 गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू होतं. याठिकाणी ‘विश्रांती वेलनेस स्पा’च्या नावाखाली अवैध पद्धतीने मसाज पार्लर सुरू होतं.

राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला सॉफ्टवेअर अभियंता; पुण्यातील खळबळजनक घटना दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास या पार्लरवर तिघे आरोपी आले होते. आरोपींनी मसाज पार्लर चालक महिलेकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली. यामुळे मसाज पार्लर चालक महिलेचा तिघां खंडणीखोरांसोबत वाद झाला.

यानंतर आरोपींनी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीला घाबरून संबंधित महिला गॅलरीमध्ये लपायला गेली. दरम्यान तिसऱ्या मजल्यावरून फुटपाथावर कोसळल्यामुळे संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. खरंतर, मृत महिलेच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं होतं.

आपली बदनामी झाली तर मुलीचं लग्न मोडेल या भितीने त्या गॅलरीत लपायला गेल्या होत्या. यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघतात तिघांचा मृत्यू ही घटना घडताच मसाज पार्लर चालक महिला तातडीने धावत फ्लॅटमधून बाहेर पडली आणि तिन्ही खंडणीखोरांना फ्लॅटमध्ये कोंडलं.

या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन खंडणीखोर तरुणांसोहत मसाज पार्लर चालक महिलेस अटक केली आहे. अन्य दोन महिलांची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago