आमदार प्रशांत परिचारक पुन्हा आमदार होणार ?

नगर पालिका निवडणुकीपूर्वीच विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार ?

 

सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राजकारण तापणार असून विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ १५ डिसेंबर रोजी संपत असल्याने या महिना अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ऑक्टोबरच्या मध्यात हि निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळूंखे यांचा १४१ मतांनी पराभव करत दणदणीत विजय संपादन केला होता.त्यांचा ६ वर्षाचा कार्यकाळ डिसेंबर मध्ये पूर्ण होत असल्याने या निवडणूक प्रक्रियेचे सूत्रे हालू लागले आहेत.राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक साळूंखे यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केलेले रणजितसिह मोहिते पाटील  हे आता भाजपात आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात ८ आमदार आणि २ खासदार भाजपचे असून तेही या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.             

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांची उमेदवारीचा निश्चित मानली जात असून गत विधान परिषद निवडणुकीत एकूण ३९८ पैकी ३९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यात महायुतीचे उमेदवार परिचारक यांना २६१ तर दीपक साळूंखे यांना केवळ १२० मते मिळाली होती.या निवडणुकीत जिल्ह्यातील सोलापूर महापालिकेसह विवीध नगर पालिकेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदान करता येते.यंदाच्या निवडणुकीत नगरसेवक मतदार संख्या वाढणार असल्याचे मानले जात असून अकलूज,मोहोळ नगर पालिका झाल्याने येथील नगरसेवकांनाही मतदानाचा हक्क मिळणे अपेक्षित आहे.       

 राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी सोलापूर जिल्हयाच्या राजकारणावर भाजपाची पकड मोठी असून ८ आमदार आणि २ खासदार भाजपचे आहेत तर जिल्हा परिषदेवर तूर्तास तरी भाजप समर्थकांचेच वर्चस्व आहे.डिसेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही मतदार संघातून विजयी झाले होते.त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे नैराश्य आले होते.मात्र एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या पंढरपूर विधान सभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयाने जनतेत महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत नाराजी आहे हा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी भाजपला बळ मिळाले होते.     

 सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबर अखेर पूर्ण केली जाणार असल्याची चर्चा असतानाच या निवडणुकीत पुन्हा भाजपचे व मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारी बाबत पक्षाचे वरिष्ठ नेते अनुकूल असून आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांना गतवर्षी विधान परिषदेवर संधी मिळाली असल्याने आमदार परिचारक यांच्या उमेदवारीचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.अशातच परिचारकांच्या उमेदवारीसाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोलापूर  जिल्ह्यातील भाजपचे बहुतांश आमदार आणि दोन्ही खासदार हे अनुकूल असल्याचे समजते तर आमदार सुभाष देशमुख हेही विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी कराव्या लागणाऱ्या अर्थपूर्ण उपाय योजना लक्षात घेत विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीस संमती दर्शवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.        

पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगर पालिकेच्या निवडणुका डिसेंबर २०२१ पूर्वी होणे अपेक्षित आहे.मात्र नगर पालिकांच्या निवडणुकीपूर्वीच विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण असून विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर नगर पालिकेच्या पुढील निवडणुकीत आणखी ”जोमाने” तयारीनिशी मैदानात उतरता येणार असल्याची खुमासदार चर्चाही सुरु झाली आहे.    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

21 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

21 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago