एका वरिष्ठ स्तरीय वन अधिकाऱ्याला सोमवारी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक बळीराम तुकाराम कोळेकर (57) असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळेकर यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना त्याच्या सेवेसाठी अनुदान मिळणार आहे. यासंबंधित फाईल क्लिअर करण्यासाठी कोळेकर यांनी त्यांच्याकडे अनुदानातील 5% टक्के रक्कम आपल्याला द्यावी लागेल, असे म्हणत लाच मागितली. या अधिकाऱ्याने कोळेकर यांना 92,000 रुपये दिले. यानंतर या अधिकाऱ्याने याची तक्रार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली.
या अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचून कोळेकर यांना अटक केली. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एसीबीला त्याच्या कार्यालयाची झडती सुरू असताना एका कपाटातून 12 लाख रुपये सापडले आहेत. एसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…