एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क 550 कोटी सापडले.
नेमका प्रकार काय?
तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. इतर गोष्टी मिळून आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तकं आणि रोख रक्कम मिळून आलीय. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत.
या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर, जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…