ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी चा 22 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 22 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सहकार शिरोमणी कारखान्याचे जेष्ठ् सभासद रेवणसिध्द् पुजारी, रा.विटे यांचे अध्यक्षतेखाली व वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे व त्यांच्या सुविद्यपत्नी डॉ.सौ.जयश्रीताई शिनगारे या उभयतांच्या शुभहस्ते आज 11 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. संपन्न्‍ झाला.

यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते. होमहवन पुजा कारखान्याचे जेष्ठ् तोडणी वाहतुक ठेकेदार श्री.सुभाष ढोबळे, उंबरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रेखाताई ढोबळे याचे शुभहस्ते करण्यात आली.  सुरुवातीस मा.पाहुणे यांच्या शुभहस्ते श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले लखीमपुरी खिरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज संपुर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यात आम्हीही सहभागी आहोत. परंतु पुर्व नियोजित हा कार्यक्रम असल्यामुळे हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे सांगितले. मागील दोन-तीन सिझन जुनी मशिनरी, को-जनरेशन प्रकल्प्‍, मशिनरी आधुनिकीकरण तसेच साखरेच्या दरातील चढ उतार यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत होता.  बँकांकडून कर्ज उपब्ध्‍ होत नव्हते. 

परंतु ज्याप्रमाणे स्व. दादांनी अनेक अडचणीतुन भाळवणीच्या माळ रानावर या कारखान्याची निर्मिती केली, त्यांचा वारसा जपत कारखान्यास पुर्व गतवैभव प्राप्त्‍ करुन देण्यासाठी आम्ही सर्व संचालकांनी स्वताच्या जमिनी गहाण ठेवुन निधी उपलब्ध्‍ केला असून, अनेक अडचणींवर मात करुन संघर्ष करत मार्ग काढत आहोत. चालु गळीत हंगामात सुमारे 5.50 लाख मे.टनापेक्षा जास्त गळीत करण्याचे उद्दिष्ट् असून, त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरुस्तीची सर्व कामे करुन घेण्यात आली आहेत, 240 ट्रक ट्रॅक्टर, 227 बैलगाडी, 110 ट्रॅक्टर बैलगाडी करार करुन यंत्रणा सज्ज्‍ ठेवण्यात आली आहे, मागील सालातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची ऊस बिलाची 75 टक्के रक्कम अदा केली असून, लवकरच थकहमी मिळाल्यामुळे उर्वरीत बिलेही देण्यात येणार असल्याचे सांगुन आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त्‍ केली.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सुधिर शिवाजी शिनगारे यांनी कारखाना उभारणीच्या काळापासून स्व्. दादांनी हा कारखाना उभा करण्यासाठी केलेला संघर्ष आणि हा गळीत हंगाम चालु करण्यासाठी चेअरमन कल्याणराव काळे करीत असलेले अहोरात्र कष्ट् समक्ष पहात असल्याचे सांगुन, स्व.दादांच्या आठवणीस उजाळा देवुन, बॉयलर अग्निप्रदिपन आम्हा उभयतांचे शुभहस्ते करण्याची संधी मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगुन, शुभेच्छा व्यक्त्‍ केल्या.

यावेळी कारखान्याने नुतन कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी कारखान्यास अविरत ऊस गळीतास देणारे जेष्ठ् सभासद, कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवणसिध्द् पुजारी यांची आणि तोडणी वाहतुक ठेकेदार सुभष ढोबळे यांची उपस्थितांना ओळख करुन देवुन, चालु गळीत हंगामामध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने चालवुन गळीताचे 5.50 लाख पेक्षा जास्त्‍ गळीत करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी जबाबदारीने काम करण्यास सांगितले.

तसेच  सर्व शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देवुन कारखान्याची आर्थिक स्थिती बळकट करणेकामी सहकार्य करावे अशी विनंती केली. संचालक सुधाकर कवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सुत्र संचलन समाधान काळेसर यांनी केले.

यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,  प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, माजी चेअरमन महादेवभाऊ देठे, जनकल्याण हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर्स, विठ्ठल कारखान्याचे आजी-माजी संचालक, सहकार शिरोमणी कारखान्याचे आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

19 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago