आ.समाधान आवताडे यांनी कुष्ठ बाधित वसाहतीची केली पाहणी

आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूर येथील गोपाळपूर रस्त्यावरील इंदिरा कुष्ठ बाधित वसाहतीस भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आजराचा सामना करणारे,कुटूंबापासून दुरावलेले अनेक कुष्ठ बाधित या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांना आरोग्यपूर्ण व स्वछ वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे हे ओळखून  या परिसरात निदर्शनास येणारी अस्वछता तातडीने दूर केली जावी अशा सूचना पंढरपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी याना फोनद्वारे दिल्या.व सदर वसाहतीचा परिसर आजच्या आज स्वच्छ करून घेण्याचे आदेश दिले.
          या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांचे सोबत विनोदराज लटके, भैय्यासाहेब कळसे, अमोल धोत्रे, परसु पवार, अविनाश मोरे, रवि बंदपट़टे ,सुरज पाटील,अभिजित मोरे,नवनाथ शिंदे, पंढरपूर जनसंपर्क कार्यालय प्रमुख बालम मुलानी व कुष्ठ वसाहत परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 day ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

2 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago