प्रशांत खलिपे यांची पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनिवड

पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा पंढरपूर येथील केमिस्ट भवन येथे दिनांक १० ऑक्टोबर  रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.असोशियनचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात आलेले विविध विधायक उपक्रम आणि कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यात समन्वय साधत प्रशांत खलिपे यांनी बजावलेली प्रभावी भूमिका लक्षात घेत त्यांची असोशियनच्या निवडणूक प्रक्रियेनुसार अध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली.
   या वेळी पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नवीन कार्यकारी मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी गोवर्धन भट्टड यांनी पुढील प्रमाणे घोषित केले.
अध्यक्ष- श्री प्रशांत खलीपे

उपाध्यक्ष-श्री मिलिंद उकरंडे
सचिव -श्री महादेव जाधव
खजिनदार-श्री श्रीरंग राहेरकर
सहसचिव.-सौ दिपाली ताई कारंडे
जनसंपर्क अधिकारी- श्री उमेश गायकवाड
तर संचालक पदी, सौ श्रद्धाताई कुलकर्णी, श्री रावसाहेब गवळी, श्री शिवराज पाटील, श्री मनोज वास्ते, श्री सचिन मेनकुदळे यांची निवड करण्यात आली.

 यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सतीशअण्णा सादिगले,जेष्ठ केमिस्ट श्रीरंग बागल,मार्गदर्शक गोवर्धन भट्टड यांच्यासह सर्व जेष्ठी केमिस्ट बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.   
 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago