अभिजीत पाटील साखर कारखानदारीतील डॉक्टर -मा.आ.दीपक साळूंखे-पाटील

सांगोला सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांच्या धाराशिव कारखान्याने चालविण्यास घेतला असून  येथे सन 2021-22 च्या  गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माउली महाराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास दहा ते बारा वर्षे बंद असणारा हा कारखाना यंदा सुरू होत असल्याने सांगोला व पंढरपूरच्या उसाची सोय होणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते सागर पाटील उपस्थित होते.  यावेळी ह.भ.प.माउली महाराज यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी होमहवन पूजा पळशी गावचे प्रगतशील बागायतदार हणमंत पाटील व रतनताई पाटील तसेच पांढरेवाडी गावचे सचिन घाटे व  उर्मिलाताई घाटे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.
साळुंखे-पाटील म्हणाले , तीन साखर कारखाने चालविण्याचा दांडगा अनुभव अभिजित पाटील यांच्याकडे असल्याने कारखान्याची कामे लवकर पूर्ण केली आहेत. कारखानदारीतील डॉक्टर म्हणून त्याच्याकडे बघितला तर वावगं ठरणार नाही. या भागातील शेतकर्‍यांना, कामगारांना न्याय देण्याचं मोठे काम त्यांनी केले आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगोला,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपास आणू अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी दिली. याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजित भोसले, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे यांच्यासह सांगोल्याचे चेअरमन विश्‍वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago