ताज्याघडामोडी

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न येत्या गळीत हंगामा करिता ६ लाख .५० हजार  मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे ध्येय –उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
येत्या गळीत हंगामा करिता ६ लाख .५० हजार  मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे ध्येय –उमेश परिचारक
कचरेवाडी  येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या  २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ रविवार दि.१० रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान काेराेना संसर्गसाधीचा धाेका लक्षात घेऊन हा कार्यक्रम   अत्यंत साधेपणाने व उत्साहात साजरा करन्यात आला.
    कारखाना कार्यस्थळावर प्रारंभी कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर अनिल भोसले यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
   यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,आपल्या कारखान्या चा  हा आठवा गळीत हंगाम असून मागील सात ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केली आहे.चालू गळीत हंगामात ६.५० लाख मे.टन ऊसाचे क्रसिंग करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून सर्व ऊस उत्पादक हे नियोजित नोंदणी प्रोग्रॅम नुसारच कारखान्यास ऊस देतील अशी त्यांनी आपेक्षा केली.
या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी २०० ट्रॅक्टर, १५० मिनी ट्रॅक्टर,व 20 बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या १५ ते१६ तारखेपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे.
संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. लवकरच मोळी पूजन करून गळीत हंगामास सुरुवात होईल.त्या निमित्ताने सर्वांना नवरात्री च्या शुभेच्छा दिल्या सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री परिचारक यांनी व्यक्त केली . तसेच कारखान्याच्या व्यवस्थापना मध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक(B.E. Mech., MBA Londan) हे मदत करतील अशी अपेक्षा उमेश परिचारक यांनी व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित सर्वांनीच या घोषणेचे मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून स्वागत केले.
सदर प्रसंगी रोहन परिचारक,प्रगतशील बागायतदार महादेव लवटे,सुरेश टिकोरे,यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

21 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

21 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago