धाराशिव साखर कारखाना,संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (युनिट क्र.४) काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या कडे चालविण्यास असल्याने सुरू होत असून सन२०२१-२२ गळीत हंगामाचा “बाॅयलर अग्निप्रदिपन” ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पवार, सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते सागर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.माऊली महाराज यांचे कीर्तन करून बाॅयलर अग्निप्रदिपन सोहळा करण्यात आला. याप्रसंगी होमहवन पूजा पळशी गावचे प्रगतीशील बागायतदार हणमंत पाटील सौ.रतनताई पाटील व पांढरेवाडी गावचे सचिन घाटे व सौ. उर्मिलाताई घाटे या उभयतांच्या हस्ते करण्यात आला.
यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगोला,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली. ब्राझील येथे दुष्काळ असल्याने आपल्या येथील साखरेस उठाव आहे. त्यामुळे साखरेला दर चांगल्याप्रकारे असल्याने शेतकऱ्यांस चांगला भाव देणे शक्य होईल अशी घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली.
याप्रसंगी मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की तीन साखर कारखाने चालविण्याचा दांडगा अनुभव अभिजीत पाटील यांच्याकडे असल्याने कारखान्याची कामे लवकर पुर्ण केली आहेत. कारखानदारीतील डाॅक्टर म्हणून त्याच्याकडे बघितला तर वावगं ठरणार नाही. भागातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याचं मोठे काम केले आहे. पाटील यांच्यामुळे सांगोला व येथील नागरिकांना गतवैभव प्राप्त करून दिले आहे.
याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे यासह सांगोल्याचे चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव पंढरपूर भागातील जेष्ठ मंडळी, मित्र परिवार, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…