भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नसल्याचे बँकेने जाहीर केले होते.
बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती.
या ट्विटमध्ये म्हटले होते की, तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील.
या वेळेत एसबीआयची सेवा बंद राहणार?
एसबीआयच्या माहितीनुसार या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…