राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याला केल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्याच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. शुक्रवारी ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला. त्यामुळे शिवसेनेला आगामी निवडणुकांच्या दरम्यान मोठा भगदाड पडणार का? शिवसेनेला धक्का बसणार का? हे पाहणे आता महत्वाचं आहे.
दरम्यान, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आणि महाविकास आघाडीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा बाजी मारणार का? अशा चर्चाही सध्या सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या समर्थनार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बबनराव लोणीकर यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज माजी आमदार सुभाष साबणे यांनी दाखल केला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त झाले असल्याचं मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. तसेच देगलूर बिलोली मतदार संघातील जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहुन मोठ्या मताधिक्क्याने साबणे यांना निवडून आणण्याचं आवाहनही दानवे यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे कार्यकर्ता मेळावा घेत प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी साबणेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन देगलूर विधानसभा निवडणूकीची उमेदवार म्हणून ही जाहीर करून पाटील यांनी निवडणूकीच्या कामाला लागा असे आदेश दिले होते. लगेच प्रवेश आणि उमेदवारी जाहीर झाल्याने साबणेंच्या कार्यकर्त्यांत मोठा जल्लोष व्यक्त केला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…