संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागात परचुरी गावात 12 दिवसाच्या अंतरात एकाच घरातील दोन सख्ख्या भावांनी गळफास घेत आत्महत्या करत जीवन संपवल्याने संपूर्ण खाडीपरिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
एकाच घरात पाठोपाठ झालेल्या दोन तरुणांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. या आत्महत्यांनंतर खाडी भागातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी कळंबटेवाडी येथील वसंत शांताराम कळंबटे (35) याने 24 सप्टेंबर रोजी राहत्या घरात आत्महत्या केली होती.
वसंत हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. घरात सर्वकाही व्यवस्थित असताना त्याने असे पाऊल का उचलले? या बाबत पोलिसांनी तपास सुरू केला होता.पोलीस अद्यापही त्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच आता त्याच घरात दुसरी घटना घडली आहे.
मयत वसंतचा छोटा भाऊ विठ्ठल शांताराम कळंबटे (30) याने बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर घरात गळफास घेत आत्महत्या केली.प्रत्यक्षात मोठा भाऊ वसंत याच्या आत्महत्येनंतर विठ्ठल हा मानसिक दडपणाखाली वावरत होता. तो मानसिक धक्क्यात होता. घरातील कुटुंबीय सतत त्याची समजूत काढत होते.
बुधवारी दुपारी सर्वपित्री अमावस्याचे विधी पूर्ण करत तो आपल्या खोलीत गेला. दुपारी आई जेव्हा त्याला बोलावण्यासाठी गेली तेव्हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. संगमेश्वर पोलिसांना या बाबत खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, सहा. पो. नि. देशमुख तसेच डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुढील कार्यवाहिला सुरुवात केली होती.
दरम्यान, 12 दिवसांच्या अंतरात सख्ख्या दोन भावांनी एकाच पद्धतीने एकाच घरात आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस देखील या घटनेने बुचकळ्यात पडले आहेत. घरात सर्वकाही व्यवस्थित असताना आणि कोणताही वादविवाद नसताना पाठोपाठच्या या आत्महत्या पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे करणार आहेत. खाडी परिसरात देखील उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत असल्याने पोलिसांनी तपासला वेग दिला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…