ताज्याघडामोडी

प्रियकरासोबत उभ्या असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

राज्यात कितीही जनजागृती केली, कितीही कठोर कायदे केले तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यात रोज अनेक महिला अत्याचाराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. तिथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबत मुलालाही मारहाण केली. त्याला जखमी केलं आणि त्यानंतर पीडित मुलीला शेजारच्या शेतात नेलं आणि तिच्यावर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागपुरातच काय राज्यभरात महिला कुठेच सुरक्षित नाही आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्यामुळे पोलीस व्यवस्था ढिसाळ झाली आहे का? तरुणांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. पालकांनी या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भर रस्त्यात जर असे प्रकार घडत असतील तर यावर कठोर कारवाईची गरज आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago