पंढरपूर उप विभागातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून, यामध्ये मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, मोहोळ तर पंढरपूर तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाणे आवार येथे १७.६० ब्रास, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे १४५.५८ ब्रास, पंढरपूर ग्रामीण पोलीस आवार येथे ५८.२४ ब्रास तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे ४९.९५ ब्रास असा एकूण २७१.३७ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळू साठ्याची शासकीय किंमत १० लाख ४ हजार ६९ रुपये इतकी आहे. तर मोहोळ तालुक्यातील तहसिल कार्यालय आवारातील वाहनामधील ९०.०४ ब्रास तसेच कामती पोलीस स्टेशन येथे ९१.६७ ब्रास असा एकूण १८१.७१ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळू साठ्याची शासकीय किंमत ६ लाख ७२ हजार ३२७ रुपये इतकी आहे
सदर वाळू लिलावात भाग घ्यावयाचा अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच मोहोळ तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी तर पंढरपूर तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी गुरव यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा डी . डी.द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाद्वारे जमा करावी. तसेच बोलीच्या रक्कमेव्यतिकरक्त गौण खनिज निधी रक्कम १० टक्केचा धनादेश कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. बोलीची उर्वरित ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या आत भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणावरून वाळू घेऊन जावी. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री .गुरव यांनी केले आहे.
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…