राज्यातील कांग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारची 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाबद्दल असलेली उदासीन भूमिका,भारतीय जनता पक्षानी आपल्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसी हितार्थ घेतलेल्या निर्णयाची माहिती ओबीसी समाजाला व्हावी व राज्य सरकारणी आपल्या नाकर्तेपनामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाशी विश्वासघात केला इत्यादी ओबीसी समाजाच्या हिताचे अनेक विषय घेवून भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर २०२१ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी ओबीसी जागर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना भाजपचे ओबीसी नेते व ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी साकड़ घालून ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संत नामदेव पायरी येथून होणार आहे.यानंतर ११ वाजता श्री संत तनपुरे महाराज मठ येथे ओबीसी जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष.योगेश टिळेकर,भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्रीहंसराज अहीर,माजी ओबीसी मंत्री व ओबीसी मोर्च्याचे प्रदेश प्रभारी आ.डॉ. संजय कुटे,सोलापुरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी,खा.रणजीतसिंह नाईक-निबांळकर,आ.समाधान अवताड़े,आमदार प्रशांत परिचारक,आ.रणजीतसिंह मोहिते पाटिल,आ.राम सातपुते,आ.जयकुमार गोरे,आ.गोपीचंद पडळकर,आ.सुभाष देशमुख,आ.विजयकुमार देशमुख,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.राजाभाऊ राऊत,ओबीसी मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते,प्रदेश महिला संपर्क प्रमुख वनिता लोंढे,युवक संपर्क प्रमुख करण पोरे,भाजपा जिल्हा अध्यक्षश्रीकांत देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या वेळी राज्यव्यापी ओबीसी जागर अभियानाच्या रथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होईल व हा रथ आगामी 15 दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरेल.या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येत ओबीसी बांधव उपस्थित राहतील.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्री.प्रल्हाद सायकर, संपर्क प्रमुख सौ.वीणा सोनवलकर,प्रदेश उपाध्यक्ष श्री.आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजपा ओबीसी मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब ढगे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,अनुसूचित जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण धनवडे,शहर भाजपा अध्यक्ष श्री विक्रम शिरसट,तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे,भाजपा किसान सेलचे प्रदेश सचिव माउली हळणवर,भाजप युवा मोर्चाचे पंढरपुर शहर अध्यक्ष लाला पाणकर,ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्ष,विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.