ताज्याघडामोडी

पेन्शन पुन्हा सुरू करन्यासह कामगारांच्या विविध समस्यांसाठी आ. समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांनकडे मागणी* *कक्ष अधिकाऱ्यानं कडून कारवाई चे आदेश..*

*पेन्शन पुन्हा सुरू करन्यासह कामगारांच्या विविध समस्यांसाठी आ. समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांनकडे मागणी*

*कक्ष अधिकाऱ्यानं कडून कारवाई चे आदेश..*

महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगार यांच्या प्रलंबित मागण्या बाबत पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन प्रश्नासंदर्भात मागणी केल्या होत्या. या पत्राची दखल घेत कक्ष अधिकारी महेश दळवी यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे आयुक्त यांना वरील पत्राची दखल घेऊन अवलोकन करून कारवाई करण्याची सूचना दिली आहे

*या केल्या होत्या प्रमुख मागण्या..*

त्यामध्ये २००५ पासून बंद केलेल्या सफाई कामगारांची पेन्शन पुन्हा सुरू करावी. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांचे पेन्शन अंशराशीकरण विनाविलंब सुरू करण्यात यावे. सफाई कामगारांच्या नियुक्तीसाठी मापदंड समिती निर्माण करावी. सफाई कामगारांना त्यांच्या व्यवसायानुसार नव्हे तर शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर वर्ग-३ पदावर नियुक्ती द्यावी. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळालेल्या व काही कारणास्तव बडतर्फ केलेल्या सफाई कामगारांना सेवेत रुजू करून घ्यावे किंवा त्यांचे इतर वारस नेमणूक द्यावी. राज्यातील सफाई कामगारांचा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा. लाड/पागे समिती ची काटेकोर अंमलबजावणी ३० दिवसाच्या आत करण्यात यावी. सर्व महानगरपालिका/मध्ये रिक्त असलेल्या नियमित सफाई कामगार कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावी. शहराची वाढती लोकसंख्या वाढीवर क्षेत्रफळ लक्षात घेता नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका मध्ये १ लाख सफाई कामगारांची पदे मंजूर करण्यात यावीत. नवीन आकृतिबंध मंजूर करावा. नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका मधील सफाई कामगारांच्या वेतनावर १००% अनुदान शासनाने मंजूर करावे. वर्ग महानगरपालिका मध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता केडर मधूनच आयुक्तांची नियुक्ती व्हावी. सर्व महानगरपालिका मध्ये रिक्त असलेल्या नियमित सफाई कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावी. सर्व राज्यात नगरपालिका’ महानगरपालिका नगरपंचायत मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सफाई सेवा ठेका पद्धत बंद करण्यात यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी होऊन प्रत्येक सफाई कर्मचार्‍यांची घरे बांधून द्यावीत.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस रजिस्टर नंबर ७२६२ कामगार संघटना करीता मंत्रालयासमोर मुंबई येथे कार्यालया साठी जागा मिळावी. सफाई कामगारांचे भाग्यविधाता कर्मवीर दादासाहेब वासुदेवराव चांगरे यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे पुनर्घटन करून सफाई कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार पुढाऱ्यांची त्यावर नियुक्ती करावी. सन १९९३ पूर्वीचे कोर्टाच्या आदेशाने नियुक्त झालेल्या सफाई कामगारास लाड /पागे समितीच्या शिफारशीचा लाभ मिळावा. अनुसूचित जाती करता राखीव असलेल्या १३% आरक्षणा मधून स्वतंत्ररीत्या ५% आरक्षण वाल्मीक समाजाकरता वेगळे मिळावे. वंशपरंपरेने डोक्यावर मैला वाहणाऱ्या मेहतर/ वाल्मिकी समाजाच्या वारसदार कडून जाती प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. वारस नोकरी देताना लहान कुटुंबाचे अट स्थितील करण्यात यावी. अर्ज देण्याबाबत एक वर्षाची अट शिथिल करण्यात यावी. सफाई कामगार वरून वर्ग-३ पदोन्नती मिळाल्यास वारसा हक्कांमध्ये बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
या मागण्या यावेळी आमदार आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या.

यावर आता कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना पत्र देऊन वरील मागण्यांचा आपल्या पातळीवर अवलोकन करून कार्यवाही करावी अशी सूचना करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago