ताज्याघडामोडी

दोन हजारांची लाच भोवली : वाई पोलिस दलातील सहाय्यक फाैजदार लाचलुचपतच्या जाळ्यात

 गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रमेश कोळी यांची निवृत्ती आवघी काही महिन्यांवर आलेली असतानाच त्यांना एसीबी पथकाने ताब्यात घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार रमेश कोळी याला भेटले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यासाठी 4 हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रार याने सातारा एसीबी जाऊन तक्रार दिली.

एसीबी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार दाखल करून घेण्याची सूचना केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी मध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने ट्रॅप लावला होता. पोलिसावर ट्रॅप झाल्याने वाईसह सातारा पोलीस दलात मोठी चर्चा रंगली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून एसीबीने संशयिताला ताब्यात घेतले आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

15 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago