श्रीगोंदा तालुक्यातील वडघुल, खांहगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी गवांदे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह एका महिला सदस्याच्या मुलाविरोधात श्रीगोंदा पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपसरपंच रामदास बन्सी घोडके आणि आनंदा शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी झुंबर मुरलीधर गवांदे वडघुल खांडगाव ग्रुप ग्रामपंचयतमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. उपसरपंच रामदास घोडके व आनंदा शिंदे यांनी गावातील फॉरेस्टच्या जमिनीवरील गावकऱ्य़ांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर करत त्याची नोंद रजिस्टरला करण्यासाठी दबाव आणत होते.
मात्र, गवांदे यांनी या कामासाठी नकार दिल्याने घोडके आणि शिंदे यांनी गवांदे यांना कार्यालयातून बाहेर काढत कार्यालयाला कुलूप लावून तुम्ही आमचे काम करत नाही तोपर्यंत कामावर यायचे नाही, असे म्हणून कामावरून हाकलून लावले होते, तर घोडके याने गवांदे यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे खोटे तक्रार अर्ज देऊन त्यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव आणला होता.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात गवांदे यांना सर्वांसमक्ष झाडू मारायला लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. घोडके याने दिलेल्या खोटय़ा अर्जामुळे गवांदे यांना आपल्या मोठ्या मुलीच्या किडनीच्या ऑपरेशनवेळी रजा मिळू शकली नाही. या सर्व गोष्टींचा त्रास असह्य झाल्यामुळे गवांदे यांनी 24 सप्टेंबर रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यात उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…