मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे.
भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या PMCPune च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा
पुणे लगतच्या भागात सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग साचले आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा असंही मोहोळ यांनी म्हटलंय.
अत्यंत महत्त्वाचे !
पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा.
काही जिल्ह्यात पावसाचा इशारा
दरम्यान, आज लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात तीव्र ते अती तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…