आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन : पंढरपुरात रॅली
पंढरपूर दि. (30) :- ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथील नामदेव पायरी पासून शिवाजी चौक पर्यंत रॅली काढण्यात आली.
‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायाधिश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह-दिवाणी न्यायाधीश ए. पी. कराड यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी वेद पाठशाळा, पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींचा पोशाख परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी कायदे विषयक शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास न्यायाधीश श्रीमती ए.एस.नलगे, श्रीमती एस.एस.खरोशे, सहायक गटविकास अधिकारी श्री.पिसे, पंढरपूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. भगवान मुळे, तसेच विधिज्ञ, विधी स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास श्री.राजीव कटेकर, विधी स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…