स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्याकडून आ.परिचारकांच्या भूमिकेचे स्वागत

 

एकीकडे पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत आली असताना आज श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांत परिचारक यांनी जे प्रतिपादन केले आहे ते खरोखरच स्वागत आहे असे आहे आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल सहकारी बंद आहे भीमा सहकारी बंद आहे तसेच चंद्रभागा सहकारी देखील मोठ्या मुश्किलीने सुरू होणार आहे ही सर्व परिस्थिती पाहता आज पांडुरंग वगळता इतर कारखान्याचे सभासद ऊस कुठे पाठवायचा या विवंचनेत आहेत अशा परिस्थितीत श्री परिचारक यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी कोणत्याही कारखान्याचे असले तरीही शेतकरी म्हणून त्यांना पांडुरंग कडून न्याय दिला जाईल व त्यांच्या ऊस नेला जाईल अशी भूमिका जाहीर केली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे असे बागल यावेळी बोलताना म्हणाले..
पांडुरंग कारखान्याने स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी वेळोवेळी आम्ही ऊसदर आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी ऊस दराची कोंडी फोडण्याचे काम केले आम्ही शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे चर्चेला जायचो आणि ते मार्ग काढत असत आज प्रशांत परिचारक यांनी देखील अशाच प्रकारची भूमिका घेत स्वर्गीय सुधाकरपंत यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि शेतकऱ्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन आधार देण्याचे काम केल्याबद्दल मी त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो येत्या काळात उसाला दर देऊन आणखी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे टाकावेत अशी देखील यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो असेही पुढे बोलताना बागल म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago