अहिल्याबाई होळकर संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान सेवकांचा स्नेह मेळावा उत्साहात खऱ्या अर्थाने शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हेतू साध्य झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात संस्थेने शैक्षणिक क्रांती करून ग्रामीण भागातील दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा दूर करण्यात संस्थेला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.
संस्थेने अल्पावधीतच स्वतःचे गुणवत्तापूर्ण काम महाराष्ट्राच्या पटलावर सिद्ध केल्यामुळेच संस्थेला नुकताच मंत्री महोदय यांच्या हस्ते “आदर्श ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था” म्हणून या “राज्यस्तरीय पुरस्काराने” गौरवण्यात आल्याचे आवर्जून नमूद केले आहे. ज्या सेवकांच्या कष्टातून ही संस्था उभी राहिली, मोठी झाली. अशा सर्व सेवानिवृत्ती बंधू-भगिनींचा सत्कार करून कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे हे संस्थेचे अध्यकर्तव्य असल्याची भावना अध्यक्ष आर. एस. चोपडे यांनी व्यक्त केली.
ते विरळी (ता. माण) येथील जानुबाई विद्यालयात अहील्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून आज आखेर संस्थेत सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन आर. एस. चोपडे, व्हा. चेअरमन श्रीमती एल. टी. शेंडगे, सचिव एस. ए. पाटील, खजिनदार एस. व्ही. अनुसे, समन्वय समितीचे अध्यक्ष डी. ए. वाघमोडे, कार्यवाहक बी. पी. सरगर, ज्येष्ठ सल्लागार ए. एम. वाघमोडे, यु. आर. चोपडे, एस. के. कदम, एस. व्ही. शेळके, डी. एफ. शिकलगार, साहेबराव चवरे, विरळी हायस्कूलचे मुख्याध्यापक के. के. माने, आदीसह सर्व संचालक, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त सर्व बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डी. एफ. शिकलगार, साहेबराव चवरे, कैलास माने, एस. व्ही. शेळके,डी. ए. वाघमोडे, ए. एम. वाघमोडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव एस. ए. पाटील यांनी केले. तर सुत्रसंचलन व्ही. एन. जाधव व व्ही. यू. नलवडे यांनी केले. तर आभार व्हा चेअरमन एल. टी. शेंडगे यांनी मांडले. सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान सेवकांचा स्नेह मेळावा उत्साहात करण्यासाठी विरळी हायस्कूलच्या सर्व स्टाफ विशेष परिश्रम घेतल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…