विविध प्रलोभने दाखवून फसवणूक करणाऱ्या महाभागांचे प्रमाण आपल्याकडे कमी नाही.कधी नोकरी लावतो म्हणून,कधी परीक्षेत पास करून देतो म्हणून तर कधी कुठले तरी कर्ज मिळवून देतो म्हणून सामान्य अशिक्षित लोकांना गंडा घालणारे अनेक महाभाग आढळून येतात.यांच्या विरोधात धाडसाने फसवणूक झालेले लोक पोलीस ठाण्यात धाव घेतात तर काहीजण आपणच येड्यात निघालोय म्हणत … ला चिमटा घेऊन शांत राहतात.
अशा ४२० गिरी करणाऱ्या अनेक लखोबा लोखंडेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्या तरी दस्तूर खुद्द पोलीस कर्मचारीच जेव्हा अशा लोकांच्या भुलथापाला बळी पडतो तेव्हा विशेष चर्चेचा विषय तर होणारच.फसवणूक करणारे अगदी पैशाचा पाऊस पडण्यापासून ते नोटा डबल करून देण्यापर्यत आमिष दाखवून फसवणूक करतात तर काही भामटे उद्योग व्यापार आणि एजन्सीच्या नावाखालीही फसवणूक करताना आढळून येतात.
अशीच एक घटना सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संभाजी व्यंकटराव शिंदे या पोलीस कर्मचाऱ्या बाबत घडली असून सदर पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे हे एका गुन्ह्यातील आरोपीस घेऊन सन 2020 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये पंढरपुर कोर्टात आले असता वेळी पंढरपुर कोर्ट येथे आरोपीचे नातेवाईक समाधान आंनदा फाळके रा.हल दहीवडी ता.सांगोला हा तेथे आला होता.
त्यावेळी त्यांची समाधान फाळके यांचे बरोबर ओळख झाली होती.समाधान फाळके याने ते शेती औषधाचा व्यवसाय करत असलयाचे सांगत सांगोला भागात डाळीबांच्या बागा भरपुर आहेत व माझ्या औषधाला मोठी मागणी असते तुम्हाला एजन्सी देतो असे सांगत पोलीस कर्मचारी संभाजी शिंदेशी ओळख वाढविली. व काही दिवसांनी समाधान फाळके यांनी फिर्यादीस तुम्ही 3,00,000/- रुपये (तीन लाख रुपये ) भरुन शेतीच्या औषधाची डीलर शीप घ्या बाकीचे मी सर्व बघतो असे सांगितले.
पुन्हा काही दिवसांनी समाधान फाळके हा एक चारचाकी कार व वाहनामध्ये औषधे घेवून माझे घरी आला त्यावेळी त्याचे सोबत एक महिला होती. डीलर शीप दुस-याला देत आहे. तुम्ही लवकर पैसे भरा असे सांगू लागला.यास बळी पडत नंतर मी माझे एसबीआय बकेचा 3,00,000/- (तीन लाख रुपये ) रुपयांचा चेक समाधान आनंदा फाळके यांचे नावे लिहुन दिला. त्यानंतर सदर आरोपीने एक टेम्पो भरून औषधी माल पोलीस कर्मचारी शिंदे याच्या घरी पाठवला.
यानंतर पुढे फोन बंद करणे,फोन उचलणे असे प्रकार घडू लागले.वादावादी वाढू लागली अशातच आरोपी फाळके याने सदर पोलीस कर्मचाऱ्यासच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरवात केली.यातूनही फिर्यादी पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आणि कधी १० कधी २० करत कसेबसे ७० हजार रुपये परत मिळाले राहिलेल्या २ लाख ३० हजाराची मागणी केली असता जे काय करायचे ते कर मी पैसे देणार नाही नोकरी घालवून टाकेल अशी धमकी समाधान फाळके देऊ लागला त्यामुळे माझी फसवणूक झाली आहे अशा आशयाची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यातील कर्मचारी संभाजी शिंदे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…