ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील हा पदाधिकारी असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहली आहे.

हणमंत दणाने असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव असून लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे.

गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे दणाने यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago