लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे पती आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना 25 ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासानंतर पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अर्पणा अनिल अभंगे (वय 22, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल अभंगे याच्यासह एकाविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा आणि अनिल यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून अपर्णाने अनिलपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते.
मात्र, अनिलने पुन्हा अपर्णासोबत संसार करण्याचा तगादा लावला. दुसरीकडे प्रियकर अपर्णसोबत लग्न करण्यासाठी विचारणा करीत होता. त्यामुळे दोघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून 25 ऑगस्टला अपर्णाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी दिली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…