पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा करून त्याची विल्हेवाट मंगळवेढा तालुक्यात लावली जात असल्याची चर्चा होती.
याची दखल घेत मंगळवेढा तालुक्यातील महसूल प्रशासनाने नेमलेल्या विशेष पथकाने कारवाई करत दामाजी कारखाना,मुढवी रोड चोरटी वाळु वाहतुकीवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असताना रात्रौ11/00 वा.चे सुमारास टाटा ACE मेगा XL कंपनीची गाडी वाळु वाहतुक करीत असल्याचे आढळून आले.गाडीमध्ये टेरींगवर एक इसम बसलेला दिसला त्यास आम्ही नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव हरिदास उत्तम भोसले वय-40 वर्षे रा.सरकोली ता.पंढरपुर व त्याचे शेजारी बसलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याचे नाव समाधान गजेंद्र सोनवले वय45वर्षे रा.सरकोली ता.पंढरपुर असल्याचे सांगितले.
पर्यावरणाचा -हास करीत स्वताचे आर्थिक फायद्याकरीता वरील वाहनाच्या साहाय्याने बेकायदेशिररित्या व अवैद्या मार्गाने वाळु उपसा करुन भरून कोठेतरी खाली करून वाहनामध्ये रिकामे पोटे खो-यापाट्यासह मिळुन आले अशी फिर्याद शिवलिंग अंबाजी कोळी ,वय-57 वर्षे ,व्यवसाय -नोकरी ( मंडल अधिकारी मारापुर ) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…