ताज्याघडामोडी

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करून इसमाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आली आहे. सिरसाळा गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

गावातील अल्लाबकश शेख याने आपली पत्नी आणि 2 वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून आलाय. खून करून पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान अल्लाबकश याने असं का केलं ? याचा तपास पोलीस करत आहेत.

तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर अहवाल आल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली तर, गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान या दुर्दैवी आणि क्रूर घटनेने सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांच्या निधाननंतर नैराश्येतून पुण्यात वडिलांची आत्महत्या दोन मुलांच्या निधनानंतर नैराश्येत असलेल्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. 40 वर्षीय वडिलांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे संजीव कदम यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

संजीव कदम यांनी नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी संजीव कदम यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते.

दोन्ही मुलांच्या निधानानंतर संजीव कदम हे नैराश्येत गेले होते. वारंवार दूध मागतो म्हणून चिडून मुलाला उचलून आपटलं एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. सात्विक हा आई प्रमिलाकडून वारंवार दूध पिण्याचा आग्रह करत होता. या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात प्रमिलानं केलेल्या कृत्यामुळे निरागस मुलाला प्राणाला मुकावे लागले, आई इतकी निष्ठूर कशी झाली, अशी चर्चा परिसरात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago